धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी राजीनाम्यानंतरही मंत्रालयात कशी?   

दमानिया यांचा सरकारला सवाल

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बराच कालावधी लोटला असला, तरी मंत्रालयातील त्यांच्या नावाची पाटी अजूनही कायम आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत अंजली दमानियांनी महायुती सरकारला सवाल केले आहेत. 
 
मंत्रालयात धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे यांच्या नावाची पाटी आहे. खाली मंत्री असाही उल्लेख आहे. मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, तरी देखील त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे.  
 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडाचे नाव समोर आले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. 
 

Related Articles